जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२५ । गेल्या काही दिवसात हवामान अनेक बदल पाहायला मिळेल. सध्या महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. पण यातच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असून यामुळे राज्यात काही भागांत 2 दिवस पावसाचा हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच राज्यात येत्या तीन दिवसांत तापमान वाढणार असून उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात प्रत्यवर्ती चक्रीवादळ तयार होत आहे. यामुळे २१ आणि २२ फेब्रुवारीला राज्यातील मराठवाड्यासह विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मात्र इतर राज्यात आगामी तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून उन्हाची तीव्रताही कायम राहील. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.
राज्यातीळ या ठिकाणी तापमानात वाढ
मुंबई, सांताक्रूझ, नाशिक, पुणे, संभाजीनगर, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, यवतमाळ या शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी ३४ ते ३८ अंशादरम्यान तापमान नोंदवले जात आहे.
चक्रीवादळचा जळगाव जिल्ह्यावर परिणाम होणार का?
जळगाव जिल्ह्यात सध्या थंडी गयाब झाली असून तापमानाचा पारा ३५ अंशावर गेल्यानं उन्हाचा तडाखा वाढला आहे. बुधवारी जळगावचे तापमान किमान तापमान १५ अंशावर तर कमाल तापमान ३५ अंशावर होते. दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा जळगाव जिल्ह्यावर परिणाम होणार नाहीय. या चक्रीवादळाचा परिणाम विदर्भातील काही भागावर होऊ शकतो. तेथील काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे.