जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । राज्यात ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे बहरू लागल्या पिकांनी माना खाली टाकले असून यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. अशात आता शेतकऱ्यांच्या नजर ढगांकडे लागले असून पाऊस कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहे. अशातच राज्यात गायब झालेल्या पावसाचं आज आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे लवकर राज्यात पाऊस पुन्हा कमबॅक करण्याची शकता आहे. दरम्यान, सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली असून या महिन्याच्या शेवटी राज्यात मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात ढगाळ हवामान वाढेल, तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
या जिल्ह्यात गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता
नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते माफक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल.