⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि ऑरेंज अलर्ट; जळगावात पावसाची स्थिती काय?

राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि ऑरेंज अलर्ट; जळगावात पावसाची स्थिती काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२४ । राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होत असला तरी जळगावसह काही भागात पावसाने दोन ते तीन दिवसापासून उसंती घेतली आहे. दरम्यान, आज शुक्रवारी हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा दिलाय. तर जळगावमधील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट?
रेड अलर्ट अंतर्गत रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर रेड अलर्ट जिल्ह्यांव्यतिरिक्त पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, नागपूर आणि वर्धा यासह इतर आठ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.

ऑरेंज अलर्ट हा आगामी हवामान परिस्थितीसाठी तयार राहण्याचा इशारा आहे. या जिल्ह्यांतील रहिवाशांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार मुंबईत २२ जुलैपर्यंत पुढील चार दिवस हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

जळगावात पावसाची उसंती
गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर किरकोळ पाऊस सुरू आहे. मान्सून थोडासा अशक्त झाल्याने ब्रेक लागला आहे. सध्या दाट ढग नसल्याने पावसाने विश्रांती घेतली आहे. आज जिल्ह्यात दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.