जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२४ । राज्याच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कालच्या बारामतीच्या सभेत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. शरद पवार यांच्या फोननंतरच विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला, असा मोठा आरोप त्यांनी केला होता. या सर्वात मोठ्या टीकेनंतर आज छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात काही राजकारण सुरु असते, त्यात कधी ना कधी तरी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष भेटत असतात. त्यामुळे भुजबळ आणि पवार ही भेट कशाबद्दल आहे, हे ते या भेटीनंतर सांगतील.