जळगाव लाईव्ह न्यूज । 5 मार्च 2024 । पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची प्रक्रिया आज म्हणजेच 5 मार्च पासून सुरु झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 17 हजार जागा रिक्त आहेत. पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई आणि कारागृह कॉन्स्टेबल अशा पदांसाठी भरती होत आहे. Maharashtra Police Bharti 2024
ऑनलाईन पद्धतीनं या पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावं लागणार आहे. 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. http://www.mahapolice.gov.in आणि policerecruitment2024.mahait.org या दोन साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. दरम्यान, जळगावात 137 जागा रिक्त आहे, दहावी-बारावी पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पोलीस शिपाई – 9373
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
2) पोलीस बॅन्डस्मन –
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 10वी उत्तीर्ण.
3) पोलीस शिपाई-वाहन चालक- 1576
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
4) पोलीस शिपाई-SRPF- 3441
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
5) कारागृह शिपाई – 1800
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
वयाची अट :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 28 असावे. नियमानुसार वयात सवलत मिळेल. यासाठी जाहिरात पाहावी
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]
भरती प्रक्रियेचे स्वरूप
भरती प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
शारीरिक योग्यता चाचणीत उमेदवारानं किमान ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे.
भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेदरम्यान किमान ४० टक्के गुण मिळविणं अनिवार्य आहे.
कमी गुण मिळालेले उमेदवार अपात्र ठरणार आहेत.
उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online