जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । मे महिन्यात भाजून काढणारे ऊन पडते. मात्र यंदा मेच्या सुरुवातीपासूनच वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. देशासह महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतीपिकाचे मोठं नुकसान झाले. यामुळे हा उन्हाळा आहे की पावसाळा असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र यातच भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्राला महत्वाचा अलर्ट जारी केला. 11 ते 19 मे 2025 दरम्यान राज्यात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील विविध भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये निकोबार द्वीपसमूह, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम यांसारख्या प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे स्थानिक जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या उप-हिमालयीन भागांमध्ये देखील वादळ, विजांच्या कडकडाटासह प्रतितास ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IMD च्या अंदाजानुसार, पुढील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे:
हवामान विभागाचे इशारे
यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.