जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (HSC Exam Results) मंगळवारी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजेला विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यामुळे निकाल काय येतो याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. दरम्यान, यंदा राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के लागला. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.
परीक्षेनंतर बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना होती. अखेर या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
इथेही पाहू शकता बारावीचा निकाल
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hsc.mahresults.org.in
hscresult.mkcl.org
results.gov.in. या साईटवरही पाहू शकणार बारावीचा निकाल पाहू शकतात
यंदाही मुलींची बाजी
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाची माहिती दिली. यंदा राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के लागला. बारावीची एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी देखील मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलं.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली. राज्यात यंदा कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के इतका सर्वात कमी निकाल लागला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.