---Advertisement---
वाणिज्य

आता रेशन दुकानावर मोफत साडी देण्याचा राज्य सरकरचा मोठा निर्णय

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२३ । राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार असून याबाबत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

ration sadi jpg webp

वस्त्रोद्योग विभागाने 2 जून 2023 रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एका साडीचे मोफत वाटप करण्याची योजना आखली आहे. ही योजना 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पात्र कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक या प्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.

---Advertisement---

ही योजना राज्य यंत्रमाग महामंडळ राबविणार असून 2023-24 या वर्षासाठी महामंडळ एक साडी 355 रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात येईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---