⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | बातम्या | राज्यातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर ; जळगावातील आकडेवारी वाचा..

राज्यातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर ; जळगावातील आकडेवारी वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२४ । शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून याच दरम्यान, राज्यातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर्षातील आत्महत्याचा आकडा चिंता वाढविणार आहे. धक्कादायक म्हणजेच शेतकरी आत्महत्याच्या क्रमवारीत जळगाव जिल्हा चौथ्या क्रमांवर आहे. जिल्ह्यात तब्बल ६२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय.

या चार महिन्यात सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५ आणि एप्रिलमध्ये १८० आत्महत्या झाल्याची नोंद समोर आली आहे. या चार महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. राज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात ८४,शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत.

या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगरमध्ये १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान, राज्यात आरोप प्रत्यारोप आणि पळवा पळवीच्या राजकारणात सरकार व्यस्त असल्याने शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही ? असा सवाल शेतकरी कुटुंबियांकडून केला जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.