जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळा बंद करण्यात आल्या. ऑफलाईन वर्ग बंद करुन ऑनलाईन शाळा सुरु आहे. मात्र, आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात, असे या प्रस्तावात म्हटले आहे. दरम्यान, या प्रस्तावावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्यातील शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करुन पुन्हा एकदा घरातून ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता कोरोना रुग्णवाढ पुन्हा कमी झाल्यामुळे तसंच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणालाही वेग आल्यानं शाळा पुन्हा सुरु केल्या जाव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.
मात्र धोका अजूनही टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले जावेत, असा प्रस्ताव देण्यात आला आहेत. संपूर्ण खबरदारी घेत शालेय मुलांचं कोणतंही नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण मंत्र्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून शाळा सुरु होतात का, याकडे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचंही लक्ष लागलंय.
दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही दोन दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेवून शाळा सुरू करण्याबाबतचे संकेत दिले होते.
हे देखील वाचा :
- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस संपन्न
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
- अक्षरयात्री साहित्य संमेलनातून जागतिक मैत्रीचा संदेश सर्वदूर जाईल – इरोशनी गलहेना
- लसूण पोहोचला ५०० रुपये किलोवर; गृहिणींचे किचन बजेट कोलमडले
- आरआरबी परीक्षार्थीसाठी भुसावळ, जळगावमार्गे १० रेल्वे गाड्या धावणार