जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२४ । आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करत असून यामध्ये मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष महिलासांठी महायुती सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत मिळणार आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली असून याद्वारे महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली
यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. मागच्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. “महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या” असं अजित पवार म्हणाले.
अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत मिळणार आहे. तर “महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल” असं अजित पवार म्हणाले.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1108769943558529