जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शिवशंकर भगवानचे केवळ देशभरात नव्हे तर जगभरात अनगणित भाविक आहेत. गेल्या काही वर्षात महाकालचे चाहते तरुण वर्गात वाढत आहेत. दररोज नव्हे तर दिवसभर भगवान भोलेनाथची गाणी तोंडावर असतात असे कितीतरी भाविक आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. भगवान शिवशंकरांची अनेक नावे असून भोलेनाथ, महाकाल, शिवा, शिव शंभो, महेश, महेश्वरा, शंकरा, कैलासवासी, पिनाकी, विश्वेश्वर अशा अनेक नावांनी आपण त्यांची भक्ती करीत असतो. महाकालची युट्युबला हजारो गाणी असून त्यापैकी काही गाणी नेहमीच गायली जातात. शहनाज अख्तर, बाबा हंसराज रघुवंशी आणि अभिलिप्सा पांडा यांची काही गाणे सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहेत.
गुरुवारपासून श्रावण महिना सुरु होत असून श्रावण महिना भगवान भोलेनाथ यांचा पवित्र महिना समाजला जातो. मारवाडी बांधवांचा श्रावण महिना आठ दिवस अगोदरच सुरु झालेला आहे. श्रावणातील शिवरात्री कालच पार पडली. दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून सुरु होणाऱ्या श्रावणात भगवान शिवशंकरांच्या देवळात दररोज, विशेषतः सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होत असते. घराघरात आणि मंदिरांमध्ये भगवान भोलेनाथ यांची गाणी वाजवली जात असल्याने वातावरण देखील प्रसन्नित व उत्साहवर्धक राहते. सकाळच्या प्रहराला ओमकर मंत्राचा देखील जाप केला जातो. रावण देखील शिवशंकराचा सर्वात मोठा भक्त होता. रावण रचित शिव तांडव स्तोत्र प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे.
कला जोपासण्याच्या नादात संसारिकपणा समजून घेण्याची संधीच मिळाली नाही. प्रत्येक बाबतीत ती अपरिपक्व होती. प्रियकराच्या खुनाच्या गुन्ह्यात देखील तिला कारागृहात लागले होते. तुरुंगाच्या भेटीने मला खूप काही शिकवले. आता मी नव्याने आयुष्याला सुरुवात करत आहे. वरच्याने वाईट दिवस दाखवले, आता अच्छे दिनही दाखवतील. टीका मला अजिबात त्रास देत नाही’ असे म्हणणे आहे जागरण गाण्याची प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर हिचे. छत्तीसगडमध्ये महाकौशल आणि जागरण गाण्यासाठी प्रसिद्ध असलेली शहनाज आता शहनाज उपाध्याय बनली आहे. पावन पजानिया या अल्बमने लोकप्रिय झालेली शहनाज मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बरघाट येथील रहिवासी आहे.
भगवान भोलेनाथवर गायलेली अनेक गाणे शहनाजची प्रसिद्ध आहे. जवळपास सर्वच गाण्यांनी १० लाखांच्या पुढील टप्पा ओलांडला असून काही गाणे तर ५० लाखांचा टप्पा ओलांडून पुढे पोहचले आहे. शहनाजचे आज युट्युबला २.३८ मिलियन सबस्क्राईबर आहेत. दिवसेंदिवस शहनाजचे सबस्क्राईबर्स वाढत आहेत. स्थानिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासोबतच देशभरात विविध समारंभ, भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती देत गायन देखील शहनाज अख्तर करीत असते. शिवशंकर भगवानवर शहनाजने अनेक गाणी गायली आहेत. तसेच प्रभू श्रीरामचंद्रावर देखील त्यांनी गाणे गायली आहेत.
शहनाज अख्तरने गायलेल्या गाण्यांपैकी उज्जैन के महाकाल, मेरे भोले से भोले बाबा, तकदीर मुझे ले चल महाकाल के बस्ती मे, चिलम पे चिलम शहनाज, भोले कि फौज करेगी मौज, पालकी महाकाल की, महाकाल कि नगरी मे उम्र गुजर जाये, बोल बम, भोले भोले असे काही गाणे आणि भजन प्रसिद्ध आहेत. शहनाज अख्तर मुस्लीम असूनही भजन गात असल्याने बऱ्याचदा त्यांच्यावर टीका देखील होते.
अभिलिप्सा पांडा हे मधुर आवाजाच्या जगात वेगाने वाढणारे नाव आहे. आज ज्या आवाजाने फार कमी कालावधीत स्वत:साठी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिलिप्सा पांडाचा संगीताशी दीर्घ संबंध आहे. अभिलिप्साचा जन्म ओरिसाजवळील एका गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा जवळच्या गावात हार्मोनियम वाजवण्यासाठी प्रसिद्ध होते. अभिलिप्सा पांडाचे आजोबा जेव्हा संगीत करायचे, तेव्हा अभिलिप्सा आजोबांसमोर गुडघे टेकून हार्मोनियमवर हात ठेवत असे. अभिलिप्सा पांडा थोडी मोठी असताना तिच्या आजोबांनी अभिलिप्साला शास्त्रीय संगीताचे योग्य प्रशिक्षण दिले. अभिलिप्सा पांडाचे अद्याप लग्न झालेले नसून ती अनेक वर्षांपासून गाणे, नृत्य करणे यासारखे उपक्रम करत आहे. नुकतेच रिलीज झालेले ‘हर हर शंभू शिव महादेवा’ सुपरहिट झाले असून त्यामुळेच अभिलिप्साची कीर्ती वाढत आहे.
भोलेनाथच्या गायकांमध्ये सर्वात अगोदर नाव येते ते बाबा हंसराज रघुवंशी या अवघ्या ३० वर्षीय तरुणाचे. हंसराज रघुवंशी भारतातील एक उभारता स्टार आहे. ‘मेरा भोला है भंडारी’ या गाण्याने देशभर प्रसिद्धी झोतात आलेल्या हंसराज रघुवंशी नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे सर्वांच्याच चर्चेचा विषय असतो. मूळचा हिमाचल प्रदेशचा असलेला हा स्टार अवघ्या काही वर्षात सर्वांचा लाडका गायक बनला. हंसराज रघुवंशी यांची फॅन फॉलोअर्स अल्पावधीतच इतकी वाढली आहे की त्यांच्या प्रत्येक गाण्याला यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात. आणि लोक पुन्हा पुन्हा नवीन गाणी आणि गाण्यांची मागणी करत राहतात.
हंसराज यांचा जन्म 18 जुलै 1992 रोजी हिमाचल प्रदेशमध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यांचे गाणे “मेरा भोला है भंडारी” हे महाशिवरात्रीला iSur स्टुडिओने रिलीज केले होते आणि आतापर्यंत या गाण्याला २५५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याने हंसराज रघुवंशी यांना नवी ओळख दिली. हंसराज रघुवंशी हे भगवान ‘शिव’चे भक्त आहेत. महाविद्यालयात असताना त्यांनी भोलेबाबावर एक गाणे गायले होते आणि म्हणूनच लोक त्यांना ‘बाबाजी’ या टोपण नावाने ओळखतात. बातमीनुसार, हंसराज रघुवंशी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, तो लवकरच सनी देवलच्या मुलाच्या डेब्यू चित्रपटातून पार्श्वगायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हंसराज रघुवंशी यांचे आज युट्युबला तब्बल ९० लाख स्बस्क्राइबर्स आहेत. आजपर्यंत हंसराज रघुवंशीने गायलेल्या प्रत्येक गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हंसराज रघुवंशीची कितीतरी गाणी अशी आहेत ज्या गाण्यांनी करोडोंचा टप्पा कधीच ओलांडला आहे. मेरा भोला है भंडारी, शिव समा रहे, लागी लगन शंकरा, शिव शिव शंकरा, भोला मस्त मलंग, शिव कैलाशो के वासी, भोलेनाथ कि शादी, महाकाल की महाकाली अशी त्यांची गाणी प्रचंड प्रसिद्ध झाली आहेत. बाबा हंसराज सांगतात, 11 सप्टेंबर 2017 रोजी माझ्या आयुष्यात माझी प्रेयसी कोमल सकलानी आली. तिने माझ्या आयुष्यातील सर्व काही बदलले. माझे संपूर्ण वातावरण सकारात्मक आणि कंपनी चांगली बनवली आणि मी स्वतःहून काम करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू लागलो. आज मी कितीही मोठा झालो आहे, ते कोमलच्या पाठिंब्याशिवाय आणि प्रेरणेशिवाय शक्य झाले नसते, असे त्यांनी सांगितले आहे.