⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | बेरोजगार युवकांसाठी खुशखबर! रेल्वेत होणार 19000 जागांसाठी महाभरती

बेरोजगार युवकांसाठी खुशखबर! रेल्वेत होणार 19000 जागांसाठी महाभरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२४ । रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. पश्चिम बंगालमधील कंचनजंगा ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने काढलेल्या विविध ५६९६ पदांसाठीच्या रिक्त जागांमध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे.

बोर्डाने आता एकुण १८७९९ सहाय्यक लोको पायलटच्या भरतीचे निर्देश तात्काळ लागू केले आहे. बोडनि सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एका आठवड्यात चालक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. या निर्णयामुळे ओव्हर ड्युटी करणाऱ्या चालकांवरील ताण आणि चालकांच्या चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा रेल्वे बोर्डाचा प्रयत्न आहे.

यापूर्वी १५ डिसेंबर २०२३ रोजी ५६९६ असिस्टंट लोको पायलट पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व विभागीय रेल्वे बोर्डामधून एएलपीची अतिरिक्त भरती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतल्यानंतर, भारतीय रेल्वे बोडनि आता १८७९९ एएलपींची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे भरती बोर्डाचे संचालक विद्याधर शर्मा यांनी हे आदेश प्रसिद्ध केले आहे. रेल्वे रिक्रूटमेंट मॅनेजमेंट
सिस्टम रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, बंगलोरच्या मदतीने एएलपीची भरती प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण करेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.