जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ। तुम्हीही दहावी नंतर आयटीआय केला असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून भरती सुरु आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 10 जानेवारी 2025 पर्यंत होती. मात्र या भरतीसाठी आता 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. त्यामुळे तुम्ही अद्यापही अर्ज केला नसेल तर त्वरित अर्ज करा.

महाजेनको मार्फत तब्बल 800 भरल्या जाणार आहे. अर्ज करण्याऱ्या उमेदवारांना ibpsonline.ibps.in/mspgctjun23/ या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : तंत्रज्ञ-3
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता : ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹500/- रुपये तर मागास प्रवर्ग: ₹300/- रुपये फी भरावी लागेल.
वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना ३४,५५५/- ते ८६,८६५/- पर्यंत दरमहा पगार मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा