⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | राज्यातील जनतेला महावितरण देणार वीज दरवाढीचा शॉक ; ‘एवढ्या’ टक्क्यांनी होणार वाढ?

राज्यातील जनतेला महावितरण देणार वीज दरवाढीचा शॉक ; ‘एवढ्या’ टक्क्यांनी होणार वाढ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । अगोदरच सर्वसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडलेले असताना आता लवकरच नविन झटका मिळण्याची शक्यता आहे. महावितरण (Mahavitaran) लवकरच सर्वसामान्यांना एक मोठा झटका देणार आहे. महावितरणने वीजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगासमोर मांडला आहे.

खरं पाहता वाढती थकबाकी यामुळे महावितरण गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात जात आहे. महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी ग्राहकांच्या माध्यमातून अदा होत नसल्याने महावितरण तोट्यात आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणने 37% वीजदर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. जर का हा प्रस्ताव मान्य झाला तर 2 रुपये 55 पैसे प्रति युनिट इतकी दरवाढ होणार आहे. या दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणीतील नागरिकांना बसणार आहे.

परंतु आयोगाच्या पुढ्यात हा प्रस्ताव आल्यानंतर यावर 15 फेब्रुवारी पर्यंत हरकती, सूचना मागवल्या गेल्या होत्या. या प्रस्तावावर अनेकांनी हरकती नोंदवल्या आहेत. मात्र असे असले तरी किमान 15% वीज दरवाढ होईल असं काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे.

निश्चितच वीज आयोग या प्रस्तावावर काय निर्णय घेते आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. परंतु एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टनुसार, वीज आयोग पंधरा टक्के वीजदरवाढीवर सकारात्मकचा निर्णय घेईल आणि 15% इतकी वीज दर वाढ होऊ शकते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.