⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात मेगाभरती ; पदवीधरांना नोकरी संधी!

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात मेगाभरती ; पदवीधरांना नोकरी संधी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही गोड बातमी असू शकते. कारण महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेली आहे. Maha Food Bharti 2023

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार mahafood.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी अर्ज करावा. Maha Food Recruitment 2023

या पदांसाठी होणार भरती
या भरतीद्वारे एकूण 345 जागा रिक्त आहेत.त्यात पुरवठा निरीक्षक, गट-क पदाच्या 324 जागा आहेत. तर उच्चस्तर लिपिक, गट-क पदाच्या 21 जागा रिक्त आहे.

शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा, तसेच अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. वयोमर्यादाबद्दल बोलायचं झाल्यास या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट राहील

परीक्षा फी : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
इतका पगार मिळेल :
पुरवठा निरीक्षक, गट-क – रु. 29200/- ते 92300/-
उच्चस्तर लिपिक, गट-क – रु 25500/- 81100/-
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.