---Advertisement---
यावल गुन्हे

लंपीचा कहर सुरूच, दोन दिवसात दोन बैल दगावले

---Advertisement---

Yawal News । जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील मोहराळा येथे दोन दिवसात लंम्पी मुळे दोन बैल दगावल्याची घटना घडली. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहे. लंम्पीवर उपचार सुरू असतांना बैलांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

lumpy skin jpg webp

मोहराळा ता.यावल येथे गावात लंम्पीचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. दोन दिवसात येथे दोन बैल दगावले आहे. शुक्रवारी येथे एक बैल दगावला होता व पुन्हा शनीवारी गावातील शेतकरी प्रकाश जिजाबराव पाटील यांच्या ५० हजार रूपये किंमतीच्या बैलाचा लम्पीवर उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. या बाबत पशुधन विकास अधिकारी कार्यालय यावलचे डॉ. एस.एन. बढे यांना माहिती देण्यात आली. तेव्हा गावात डॉ. राजू सुशिल, सहाय्यक युवराज अडकमोल यांनी येवून मृत बैलाचा पंचनामा केला व नंतर शवविच्छेदन करून बैलावर अंतसंस्कार करण्यात आले.

---Advertisement---

लंम्पीमुळे गावात दोन दिवसात दोन बैल दगावाल्याने पशु पालक व शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. लंम्पीमुळे बैल दगावल्याने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---