जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२४ । जळगाव | रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रशासनाकडून एलटीटी मुंबई ते रक्सौल दरम्यान विशेष गाड्यांच्या ३६ फेऱ्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या गाडीला भुसावळ येथे थांबा आहे. एलटीटी मुंबई रक्सौल अतिजलद विशेष गाडीच्या ३६ फेऱ्या होतील.
०५५८६ क्रमांकाची गाडी ६ ऑक्टोबर ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दर रविवारी दुपारी ४ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि रक्सौल येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या १८ फेऱ्या होतील. तर ०५५८५ क्रमांकाची विशेष गाडी ४ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत दर शुक्रवारी रक्सौल येथून दुपारी ४.५५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता एलटीटी स्थानकावर पोहोचणार आहे.