जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२५ । दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार आज १ नोव्हेंबर रोजी 19 किलो वजनाच्या कॉमर्शियल (व्यावसायिक) एलपीजी सिलिंडरच्या दरात पाच रूपये कपात करण्यात आली आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. दुसरीकडे घरगुती वापरातील गॅस जैसे थे आहेत.

सरकारी कंपनी इंडियन ऑयलच्या (IOC) संकेतस्थळानुसार, 19 किलो वजनाच्या सिलिंडरच्या किंमतीत ५ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याआधी एक ऑक्टोबर रोजी व्यावसाकिय गॅस सिलिंडरच्या दरात 15.50 रुपयांची वाढ कऱण्यात आली होती.

आजच्या घसरणींनंतर आता राजधानी दिल्लीमध्ये सिलिंडरची किंमत 1590.50 रुपये इतकी झाली आहे. तर कोलकातामध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता १६९४.०० रुपये झाली आहे. मुंबईत आता ते १५४२.०० रुपये, तर चेन्नईमध्ये ते १७५०.०० रुपये इतकी किंमत झाली आहे.

सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या, परंतु घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. शेवटच्या वेळी घरगुती सिलिंडरच्या किमती मार्च २०२४ मध्ये कमी करण्यात आल्या होत्या आणि तेव्हापासून कोणतीही कपात झालेली नाही. सध्या १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत ८५८ रूपये इतकीच आहे.



