⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सर्वसामान्यांना झटका ! LPG सिलिंडर महागला, आता एका सिलिंडरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे

सर्वसामान्यांना झटका ! LPG सिलिंडर महागला, आता एका सिलिंडरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । साधारणपणे तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलिंडरच्या किमती सुधारतात. 1 जुलै 2023 रोजी यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता, मात्र तीन दिवसांनंतर आज मंगळवारी कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून मोठा धक्का दिला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी वाढ केली आहे.  दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1733.50 रुपयांना मिळणार आहे. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत 1773 रुपयांवरून 1780 इतकी वाढली आहे

चार महिन्यांनी सात रुपये
गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला जात होता. मात्र आजपासून दरात किरकोळ वाढ झाली आहे. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती. त्यानंतर एप्रिलमध्ये तो 2028 रुपयांवर घसरला, मेमध्ये तो 1856.50 रुपये झाला आणि 1 जूनला तो 1773 रुपये झाला. आता चार महिन्यांनंतर सिलिंडरची किंमत सात रुपयांनी वाढली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.