LPG सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा कपात ; आजपासून नवीन दर लागू

डिसेंबर 1, 2025 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२५ । देशभरात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या जातात. त्याचनुसार आज १ डिसेंबरपासून नवीन गॅस सिलिंडरच्या किमती लागू झाल्या आहेत. यावेळी, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत थोडीशी कपात करण्यात आली आहे, तर घरगुती सिलिंडरच्या किंमती जैसे थे आहेत, दरांमध्ये कोणतीही वाढ अथवा कपात करण्यात आलेली नाही.

gas jpg webp

आज एक डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये १० रूपयांची कपात करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात एलपीजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ५ रूपये कपात करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये किमतीत १५.५० रूपयांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्याआधी सिलिंडरच्या किमती सातत्याने कमी होत होत्या. सरकारी मालकीच्या पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या (आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल) दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात.

Advertisements

मुंबई आणि पुण्यामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १,५३१.५० रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत १,६८४.०० रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ते १,७३९.५० रुपये इतकी झाली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमतीत कोणताही बदल झाला नाही. घरगुती सिलिंडरची किंमत ८ एप्रिल रोजी शेवटची बदलण्यात आली होती. मुंबईत ८५२.५० रुपये, दिल्लीमध्ये ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपये इतकी किंमत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now