जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । भारताचा २०२५-२६ वर्षांसाठी अर्थसंकल्प (Budget 2025) आता काही तासात संसदेत सादर केला जाणार असून यादरम्यान काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यापूर्वीच आज शनिवारी एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.देशातील तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली. Gas Cylinder Rate Today

ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक सिलिंडरच्या दरात ७ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून किंमती लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर आहेत.
२०२५ वर्षाच्या दुसर्या महिन्यातही सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. आता मुंबईमध्ये व्यवसायिक गॅसची किंमत 1749.50 रूपयांना मिळणार आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील आठ महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीचे दर स्थिर आहेत.
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली. IOCL च्या संकेतस्थळानुसार, १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईमध्ये 1749.50 रूपयांना मिळणार आहे. कोलकात्यामध्ये १९०७, चेन्नईमध्ये १९५९.५० रूपयांनी सिलिंडर मिळेल. याआधी एक जानेवारी २०२५ रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. तर डिसेंबर २०२४ मध्ये गॅस सिलिंडरच्या दरात १४ रूपयांनी वाढ करण्यात आली होती.
घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही –
घरगुती १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च २०२५ मध्ये घरगुती गॅसच्या किंमतीत बदल झाला होता, त्यावेळी गॅसच्या किंमती १०० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. दिल्लीमध्ये ८०३, कोलकात्यात ८२९, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळतोय. त्यासोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रूपयांची सबसिडी मिळत आहे.