⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांची लूट, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । जगभर प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा‎ मोबदला मिळत नसल्याने शेतकरी‎ हैराण आहेत. जळगाव‎ व्यापाऱ्यांच्या मनमानी व‎ आडमुठेपणामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट‎ सुरु आहे. बोर्डाच्या भावाप्रमाणे‎ भाव द्यावा, अशी मागणी यावल‎ तालुक्यातील मनवेल येथील विविध‎ कार्यकारी सहकारी सोसायटीचे‎ चेअरमन कमलाकर हिरामण‎ पाटील (Kamalakar Patil) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे‎ केली आहे.‎

जिल्ह्यात केळीचे पीक मोठ्या‎ प्रमाणात घेतले जाते, त्यासाठी‎ उत्पादन खर्च देखील जास्त येतो.‎ जेवढा उत्पादन खर्च तेवढी रक्कम‎ ‎सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही.‎ आधीच शेतकरी नैसर्गिक‎ आपत्तीमुळे आर्थिक संकटात‎ सापडला आहे. त्यात व्यापारी फक्त‎ २०० ते २५० रुपये प्रति क्विंटल दराने‎ केळी खरेदी करीत असून‎ शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. केळी खरेदी‎ करतांना मापात पाप करणाऱ्यांवरही‎ कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी‎ चौकशी करणे आवश्यक आहे.‎

हे‎ लोकप्रतिनिधी व अधिकारी उघड्या‎ डोळ्यांनी बघत असतांनाही दखल‎ घेण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधींकडेही हा प्रश्न‎ मांडला मात्र कुणीही दखल‎ घेतलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा संकटात असताना देखील जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसून ते व्यापाऱ्यांच्या बाजूने आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.