---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा जळगाव शहर

लूट लो… काय सांगता, जळगावात पेट्रोल @५४ रुपये लीटर, पंपावर लागल्या तुफान रांगा!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । मोदी सरकार खात्यात १५ लाख पाठवणार, तेल ५० रुपये किलो झाले, पेट्रोल १०० च्या आत आले, महागाई कमी झाली.. अशा घोषणा आत्ता केवळ चर्चा होऊन बसल्या आहेत परंतु जळगावात आज एका पेट्रोल पंपावर चक्क ५४ रुपये लिटर पेट्रोल मिळत आहे. आपल्याला खोटे वाटणारी हि बातमी असली तरी ते खरे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला जात आहे.

mns petrol

आज देशभरात महागाई गगनाला भिडली आहे. वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढतच असून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे. आज पेट्रोल ११० रुपयांच्या पुढे गेले असून डिझेलने देखील शंभरी पार केली आहे. बाजारातील एकही वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेली नाही. पेट्रोल पंधरा दिवसापूर्वी स्वस्त झाले असले तरी त्याचे दर चढेच आहेत. अशात शंभरीच्या पार दर असलेले पेट्रोल तुम्हाला कुणी अर्ध्या दरात उपलब्ध करून देत असेल तर याला आश्चर्यच म्हणावे लागेल. जळगावातील सागर पार्क मैदानासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर आहे मनसेकडून केवळ ५४ लिटर दराने पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

---Advertisement---

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आज चोपन्नावा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे हेच औचित्य साधून जळगाव शहर मनसेतर्फे वाहन चालकांना ५४ रुपये दराने पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले आहे. दुपारच्या सुमारास काही काळासाठीच हि संधी असल्याने वाहनचालकांनी चांगलीच गर्दी केली आहे. शहरवासीयांसाठी ५४ रुपये लिटर या दराने पेट्रोल उपलब्ध झाले असले तरी पेट्रोल चालकाला फरकाची रक्कम मनसेकडून देण्यात येणार आहे.

जळगावात मनसेकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, विनोद शिंदे, किरण पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाहन चालकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होऊन गोंधळ काही काळ उपक्रम स्थगित करण्यात आला होता.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1212566626182233/

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---