एसटीची चाके येताहेत रुळावर, जिल्ह्यातील विविध आगारांतून लांब पल्ल्याच्या बसेस लागल्या धावू
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । एसटी शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील चार ते साडेचार महिन्यापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आधीच एसटीचे विलीनीकरण होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतरही आजही काही एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाले आहे. ३१ मार्चअखेर १९ चालक तर २१ वाहक कामावर परतल्याने आता एकूण ३१२ वाहक-चालक कामावर आहेत. त्यामुळे एसटीचे चाके पुन्हा हळूहळू रुळावर येऊ लागले आहे.
वाहक-चालक कामावर परतल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील विविध आगारांतून परजिल्ह्यासह महाराष्ट्रालगतच्या राज्यातही एसटी धावत आहे. यात जळगाव आगारातून अंकलेश्वर, वापी, सेल्वास, चिंचवड आदी नियमित बसफेऱ्या सुरू असल्याची माहिती स्थानक प्रमुख मनोज तिवारी यांनी दिली.
संपकरी कर्मचारी कामावर येत असल्याने जिल्ह्यातील सर्वच आगारांतील स्थानकांत आता प्रवासी सेवा सुरळीत हाेताना दिसत असून, प्रवासीही परतले आहेत. प्रवासी वाहतुकीला गती देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक आगारांतून लांब पल्ल्याच्या बसेसची वाहतूक सुरू केली आहे. यात जळगाव आगारातून अंकलेश्वर, वापी, सेल्वास, चिंचवड या मार्गांवर नियमित बसेस असल्याने प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, भुसावळ आदी आगारांतूनही लांब पल्ल्यांचा बसेस सोडण्यात येत आहे.
लांब पल्ल्याची वाहतूक
जळगावसह जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळ आगारांतून परजिल्ह्यासह परराज्यांत बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेश या महाराष्ट्रलगतच्या राज्यातही बससेवा सुरू करण्यात आली. जळगाव आगारातून अंकलेश्वर, वापी, सेल्वास, चिंचवड येथे. जामनेरहून उधना, पाचोऱ्यातून चिंचवड, उधना व कल्याण, अमळनेरहून अहमदनगर-पुणे, इंदूर बसफेऱ्या आता नियमित सुरू झाल्या.