जळगाव जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष उमेदवारांची यादी एका क्लिकवर वाचा

डिसेंबर 21, 2025 3:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात १६ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर होत आहे. सकाळी १० पासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलात महायुतीकडे सर्वाधिक जागा येत असल्याचे दिसतेय. तर जिल्ह्यामधील यावल येथे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने आपले खाते ओपन केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील कोणत्या पालिकेत कोण नगराध्यक्ष आहे? यादी एका क्लिकवर वाचा..

nagaradhysksha

दरम्यान यंदा नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाल्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटानंतर भाजपने आपली पकड मजबूत ठेवल्याचं दिसून आले.

Advertisements

आतापर्यंत हाती आलेल्या जिल्ह्यातील नगराध्यक्ष उमेदवारांची यादी?

Advertisements

चाळीसगाव : भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण विजयी

पाचोरा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता किशोर पाटील विजयी

शेंदुर्णी : भाजपचे गोविंदा अग्रवाल विजयी

मुक्ताईनगर : शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील विजयी.

एरंडोल : भाजपचे उमेदवार डॉक्टर नरेंद्र पाटील विजय

भडगाव : शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा मालचे विजयी

रावेर : भाजपचे उमेदवार संगीता महाजन विजय

सावदा : भाजपचे उमेदवार रेणुका पाटील विजयी

जामनेर : भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साधना महाजन बिनविरोध विजय

वरणगाव : वरणगाव येथे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुनील काळे विजयी..

नशिराबाद : भाजपचे उमेदवार योगेश पाटील विजयी

पारोळा – शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर चंद्रकांत पाटील विजयी

चोपडा -नगर परिषदेच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नम्रता पाटील विजयी

यावल – शिवसेना ठाकरे गटाच्या छाया पाटील आघाडीवर

फैजपूर – भाजपच्या उमेदवार दामिनी सराफ विजयी

धरणगाव – शहर विकास आघाडीच्या उमेदवार लीलाबाई चौधरी विजयी

अमळनेर येथे शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर परीक्षित बाविस्कर विजयी

दरम्यान, जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन या आधीच नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडून आले आहे. तर चाळीसगाव आणि भुसावळ मध्ये भाजप आघाडीवर आले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now