धान्यसाठ्यात मोठी तफावत ! यावल तालुक्यातील रेशन दुकानाचा परवाना रद्द, अनामत रक्कम जप्त

फेब्रुवारी 19, 2026 1:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील एका स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान जुलै २०२५ या महिन्यातील धान्याचे वाटप न केल्याने आणि धान्यसाठ्यात मोठी तफावत आढळून आल्यानंतर अनामत रक्कम जप्त करून जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी दुकानाचा परवाना रद्द केला. या कारवाईने काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली.

RATION SHOP jpg webp

याबाबत असे की, यावल तालुक्यातील चुंचाळे येथील यो. बा. नेवे यांच्या स्वस्त धान्य दुकानास सावखेडे येथील वि.का. सोसायटीचे दुकान संलग्न करण्यात आले होते. मात्र, या दुकानातून लाभार्थ्यांना कमी-जास्त प्रमाणात धान्य वाटप केल्याचे स्पष्ट झाले. जुलै २०२५ या महिन्यातील धान्याचे वाटप केले नसल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे धान्यसाठ्यात मोठी तफावत आढळून आली होती.

Advertisements

त्यामुळे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांच्या गव्हापोटी १ लाख ६६ हजार १४४ रुपये आणि तांदळापोटी ३ लाख ४५ हजार ६२० रुपयांची रकम वसुलीस पात्र ठरत असल्याचा निष्कर्ष जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी नोंदविला होता. त्यानंतर याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर कारवाईचे आदेश दि.१७ रोजी काढले. दरम्यान, नेवे यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करून १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत

Advertisements

तसेच सावखेडे सीम येथील दुकानातील धान्याच्या तफावतीपोटी ५ लाख ११ हजर ७६४ रुपयांची रकम अपहार झाल्याच्या दिनांकापासून वसुली करेपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्याजदराने वसुली करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच नेवे यांचा परवाना रद्द झाल्याने चुंचाळे येथील दुकानातील लाभार्थ्यांना नायगाव येथील जितेंद्र बोरसे या परवानाधारकाला तात्पुरत्या स्वरूपात जोडण्याचे आदेश दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now