जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । पाळधीसह परिसरातील चमगाव, चांदसर, शेरी, सोनवद, वाकटुकी, बाभूळगाव, नांदेड, नारणे, अंजनविहीरे ( ता.धरणगाव ) शेतीशिवारात गेल्या आठ ते दहा दिवसांत बिबट्याचा वावर असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे हिंस्त्र वन्यप्राण्यांचा धाेका ओळखून कृषीपंपांना रात्री नव्हे तर दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेने येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात कडुबा कोळी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, चांदसरचे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, जीवा सेना तालुका उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, भूषण महाजन, समाधान वाघ, किशोर पाटील, भय्या पाटील उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी