श्रीराम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या मुलाच्या रुपात भगवान विष्णूचा अवतार म्हणून प्रभू श्रीरामाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.
शुभ मुहूर्त
● राम नवमी तिथी – 10 एप्रिल 2022 (रविवार)
● राम नवमी तिथी आरंभ – 10 एप्रिल 2022, मध्यरात्री 1:32 वाजता
● राम नवमी तिथी समाप्ती – 11 एप्रिल 2022, सकाळी 03:15 वाजेपर्यंत
● राम नवमी पूजा मुहूर्त – 10 एप्रिल 2022, सकाळी 11:10 पासून ते 01:32 पर्यंत
पूजा विधि
● या शुभ दिवशी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
● घरातील मंदिरात दिवा लावा.
● घरातील देवतांना स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
● भगवान रामाच्या मूर्तीवर किंवा चित्रावर तुळशीची पाने आणि फुले अर्पण करा.
● देवाला फळे अर्पण करा.
● जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर या दिवशीही उपवास ठेवा.
● तुमच्या इच्छेनुसार सात्त्विक वस्तू देवाला अर्पण करा.
● या पवित्र दिवशी रामाची आरतीही करावी.