⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | एलसीबीने पकडली दरोडेखोरांची नवीन गॅंग, ५ गुन्हे उघड, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एलसीबीने पकडली दरोडेखोरांची नवीन गॅंग, ५ गुन्हे उघड, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील सराफा व्यावसायिकाला धारदार शस्त्राने मारहाण करून लुटल्याची घटना तीन दिवसापूर्वी नरवेल फाट्याजवळ घडली होती. व्यावसायिकाकडून मोटार सायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १७ लाख ८० हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने नवीन टोळी पकडली आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे निलेश वसंत सोनार (वय ३२, रा. नरवेल ता. मुक्ताईनगर) यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते दररोज दुकानातील दागिने आणि पैसे घरी घेऊन जात असतात. दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन घरी आपल्या दुचाकीवरून परत जात होते.

नरवेल फाट्याजवळ एका पल्सरवर चेह-यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने व दगडाने मारहान करुन निलेश सोनार यांच्याकडील ९ लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किंमतीचे २ किलोचे चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपये रोख असा एकूण १० लाख ६० हजाराचा ऐवज बळजबरीने लुटून नेले. हा झटापटीत चोरट्यांनी निलेश सोनार यांच्या हाताला आणि पायाला चाकूसारख्या शस्त्राने वार केल्यामुळे ते जखमी झाले होते.

घटना घडल्यानंतर लागलीच एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह रवाना झाले होते. तीन दिवस सलग मागोवा घेत ५ पथकांनी वेगवेगळ्या मार्गाने गुन्ह्याची एक एक कडी जोडली. विशेषतः सर्व पथके रात्रीच्या वेळी कार्य करीत होते. गुप्त माहिती आणि काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एक टोळीचा शोध लावला. सुप्रीम कॉलनीतील तिघांना घरून अटक करण्यात आली तर एक रायपूर कंडारी ता.जळगाव आणि एकाला उचंदा येथून अटक करण्यात आली.

एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, उपनिरीक्षक गणेश चौभे, सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, अनिल जाधव, युनुस शेख, हवालदार विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश गेंडे, सुनिल दामोदरे, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, अशरफ शेख, संदिप पाटील, दिपक पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, विजय पाटील, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, रविंद्र पाटील, परेश महाजन, पोकॉ विनोद पाटील, ईश्वर पाटील, दिपक शिंदे, उमेश गोसावी, रमेश जाधव, राजेंद्र पवार, भारत पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, मुरलीधर बारी, प्रमोद ठाकुर तसेच मुक्ताईनगर पो.स्टे.चे उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोहेकॉ गणेश मनोरे, पोना मोतीलाल बोरसे, धर्मेंद्र ठाकूर, राहुल महाजन, प्रशांत चौधरी, सतिष भारुडे, लतिफ तडवी अशांनी गुन्हा उघड केला आहे.

पथकाने गुप्त माहितीद्वारे विविध ठिकाणी संशयीत आरोपीचे छापे टाकलेले असता एमआयडीसी पो.स्टे. हद्दीत सुप्रिम कॉलनी मध्ये १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय-२३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता.धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव, २) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा. भिकनगाव जि. खरगौन (म.प्र.) ह.मु. रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव, ३) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु.भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव यांना आज दि.४ रोजी शिताफिने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना एमआयडीसी पो.स्टे. ला चौकशी कामी आणले असता त्यांनी मुक्ताईनगर पो.स्टे. हद्दीत नरवेल रोडवर एका सोनारास लुट्न त्यांचे जवळील सोन्या-चांदीचे दागिने हिसकविले आहे बाबत सांगितले. तसेच गुन्हयांत अजून त्यांचे साथीदार ४) विशाल देविदास मराठे रा. रायपुर कंडारी ता. जळगाव, ५) विनोद विश्वनाथ इंगळे रा. उचंदा ता. मुक्ताईनगर हे सुध्दा असल्याचे सांगितले असता पोलिसांनी त्यांच्या देखील मुसक्या आवळल्या.

ताब्यात घेतलेल्या १) सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव, २) प्रकाश वसंत चव्हाण वय ३० मुळ रा.भिकनगाव जि.खरगौन (म.प्र.), ह.मु. रामदेव बाबा मंदिर जवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव, ३) आकाश दिलीप पवार वय २४ मुळ रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु. भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव यांना अधिक विचारपुस करता त्यांनी कबुल केले की, त्यांनी सुमारे मागील ८/९ महिन्यात १) पळासखेडा से बोदवड २) वराड ते विटनेर रोडवर, ३) लासगाव ते बांबरुड रोडवर, ४) वराड ते रोडवर मोटार सायकलस्वार यांना अडवून त्यांचे कडून रोख रुपये व मोबाईल असे हिसकावून चोरी केल्याचे सांगितले.

पथकाने आणखी चौकशी केली असता जामनेर पो.स्टे. गु.र.नं. १५९/ २०२२ भादंवि क. ३७९, ३४ प्रमाणे दाखल असुन त्यात १,११,८४१/- रुपये रोख व ४,०००/- रुपयाचे ०२ मोबाईल असा एकूण १,१५,८४९/- रुपये चोरी गेलेले आहे. हा गुन्हा आरोपी आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव व त्याचा एक साथीदार (१) मनिष सुभाष चव्हाण रा. लोणवाडी ता.जळगाव अशांनी केल्याचे आरोपी आकाश दिलीप पवार यांने कबुल केले आहे.

एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. २१५/२०२२ भादंवि क.३९४,३४ आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत ९५,८७३/- रुपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा टॅब असा एकूण १,१४,६२९/- रुपयाचा माल चोरी गेलेला आहे. हा गुन्हा आरोपी सुनिल मिश्रीलाल जाधव वय २३ मुळ रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु.मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव, त्याचे साथीदार दिलीप पवार, सागर कंजर (विशाल बागडेचा भाचा) रा. कंजरवाडा, जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबूल केले आहे.

एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. ३५२/२०२२ भादंवि क.३९४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत १,०७,१५८/- रुपये रोख व ०१ मोबाईल असा एकूण १,२२,१५८/- रुपयाचा माल चोरी गेलेला आहे. हा गुन्हा आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव व सागर कंजर (विशाल बागडेचा भाचा) रा.कंजरवाडा, जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे.

पाचोरा पो.स्टे. गु.र.नं. १४९/२०२२ भादंवि क.३९२३४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयांत १,८९,६२०/- रुपये रोख चोरी गेलेला आहे. हा गुन्हा आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव यांनी त्यांचे साथीदार विशाल विजयसिंग बागडे रा.कंजरवाडा, जळगाव, व दिपक शर्मा रा.कुसूंबा ता.जळगाव अशांनी केल्याचे आरोपी सुनिल जाधव व आकाश पवार यांनी कबुल केले आहे. त्यात आरोपी विशाल विजयसिंग बागडे वय ३० रा. कंजरवाडा, जळगाव यास सुध्दा ताब्यात घेण्यात आले असून त्यास पाचोरा पो.स्टे.गु.र.नं.१४९/२०२२ भादंवि क.३९२, ३४ या गुन्हयांत पुढील तपास कामी हजर करण्यात आले आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.