जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ । आषाढी एकादशी व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते आज ‘आरोग्यमंत्रा’ या व्हाट्स अॅप सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेच्या माध्यमातून दैनंदिन आरोग्याशी निगडीत माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहोचवून आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे. तसेच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील आवश्यक सेवांविषयीची माहिती देखिल या सेवेच्या माध्यमातून पोहोचविली जाणार आहे.
हेल्थ विषयक टिप्स देण्याच्या उद्देशाने कंटेट ओशन इन्फोटेक प्रा.लि. यांच्या तांत्रिक सहकार्याने डॉ.उल्हास मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयातर्फे ‘आरोग्यमंत्रा’ सेवा सुरु करण्यात आली आहे. आपण निरोगी व दिर्घायुशी राहावे, यासाठी तज्ञांचा सल्ला या गृपमार्फत आपणापर्यंत पोहचविणे हाच एकमेव उद्देश आहे. धकाधकीच्या व ताणतणावाच्या जीवनात आपले शरिराकडे दुर्लक्ष होते. छोट्या छोट्या बाबींकडे आपण कानाडोळा करतो, याचे भविष्यात दुष्यपरिणाम पहायला मिळतात. यासाठी जनजागृतीसाठी ‘आरोग्यमंत्रा’ सेवा सुरु करण्यात आली आहे. यात आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती स्मार्टफोनवर दररोज मोफत पोहचविण्यात येईल.
‘आरोग्यमंत्रा’ या व्हाट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करून समूहात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे. या सेवेच्या शुभारंभप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. एन.एस.आर्विकर, हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, कंटेट ओशन प्रा.लि.चे संचालक डॉ.युवराज परदेशी, तुषार भांबरे, रजत भोळे यांच्यासह वैद्यकिय महाविद्यालयाचे तालुका समन्वयक उपस्थित होते.
आरोग्यमंत्राचे मेसेज आपल्या व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: