⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

पळसोदातून ५० हजाराच्या ठिबकच्या नळ्या लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । पळसोद शिवारातील शेतातून ५० हजार रुपये किमंतीच्या ठिबक सिंचनाच्या नळ्या चोरट्यांनी चोरून नेल्याचे प्रकार समोर आला आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रमोद तुकाराम पाटील (वय ४२) रा. पडसोद जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे पडसोद शिवारातील शेत गट क्रमांक ११९ मध्ये शेत आहे. बुधवार ८ जून रोजी दिवसभर शेतात काम करून सायंकाळी ६ वाजता घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतातील बांधावर ५० हजार रुपये किमतीचे १४ हजार मीटर लांबीची ठिबक सिंचनाच्या नळ्या चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी गुरुवार ९ जून रोजी सकाळी ८ वाजता प्रमोद पाटील हे शेतात गेले. तेव्हा शेतातून ठिबक नळ्यांची चोरी झाल्याचे उघडकीला आले. त्यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप पाटील करीत आहेत.