जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । पहूर येथे बंद घरात चोरटयांनी प्रवेश करीत ५० हजाराची रोकड व कागदपत्रे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या मानहिती नुसार, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे वास्तव्यास असलेल्या सुनिता सुरेश गायकवाड (वय-४५) यांच्या घरातील रोकड व कागदपत्रे गावातील गणेश जाधव नामक व्यक्तीने घरात कुणीही नसतांना प्रवेश करून चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनिता गायकवाड यांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली दाखल केली आहे. सदर तक्रारीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे हे करीत आहेत.