बातम्या

‘लखपती दीदी संमेलन’ : माझ्या आयुष्यातला महिलांचा सर्वात मोठा कार्यक्रम – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । जळगाव मध्ये पंतप्रधान यांच्या उपस्थितीत ‘ लखपती दीदी संमेलन’ ही ऐतिहासिक घटना ठरली. शासन म्हणून आम्ही होतो, त्याला प्रशासनाने अत्यंत तळमळीने, झोकून देऊन काम केले म्हणून विपरीत परिस्थितीतही हा ऐतिहासिक कार्यक्रम होऊ शकला असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एवढा सुनियोजित एवढ्या मोठ्या संख्येनी महिला एकत्र आलेला कार्यक्रम आयुष्यात पहिल्यांदा अनुभवल्याचे सांगितले.

आज नियोजन भवन मध्ये ‘ लखपती दीदी संमेलन’ आणि ‘महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सहभागी असणाऱ्या पडद्या मागच्या हातांचा गौरव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे हे मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक मोठा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यापाठोपाठ पंतप्रधानांचा एवढा भव्य कार्यक्रम तेही पावसात करणं हे सोपं काम नव्हतं. पण हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अत्यंत यशस्वीपणे केला यात. जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, आणि जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणानी अत्यंत नियोजनबद्द काम केलं त्यामुळे देशभर या कार्यक्रमाचे कौतुक होतं असल्याचे आणि तसे फोन आणि संदेश आल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
जळगाव मधला महिला सशक्तीकरण अभियाननांतर्गत घेतलेला कार्यक्रम राज्यभर गौरवला गेला आणि ‘लखपती दीदी संमेलन’ तर देशभर गाजतो आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी कुटुंबं म्हणून काम केलं. 26 एकरचा सभा मंडप, वरून पाऊस असं हे आव्हानात्मक काम गिरीशभाऊंच्या नेतृत्वात झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिलांचा झालेला हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा म्हणून नोंद झाली असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. आ. सुरेश भोळे यावेळी यांनीही या नियोजनाचे कौतुक करून, शेवटच्या घटकाला न्याय देण्याची पंतप्रधानांची भूमिका असल्यामुळे या कार्यक्रमाला झटणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कार्यक्रमातील केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांनी दोन्ही कार्यक्रमात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित , अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनावने, नगरप्रशासन अधिकारी एकनाथ पवार यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

अधिकारी, कर्मचारी यांचा गौरवपत्र देऊन सन्मान
“लखपती दीदी संमेलन’ कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव पत्र देऊन सन्मानीत केले. त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, एस. टी महामंडळ अधिकारी, ज्यांच्या ज्यांच्यावर या कार्यक्रमाकाची जबाबदारी होती त्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी दोघांनी गौरव केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button