⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

७ मे राेजी जिल्ह्यात हाेणार लाेक अदालत

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । जिल्हाभरातील सर्व न्यायालयांत ७ मे रोजी लोकअदालतिचे आयोजिन करण्यात आले असून या लोकअदालतीत तडजोडीने तसेच ऐनवेळी दाखल करण्यात आलेले खटलेही निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे देण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायालय आवारात समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ होईल. जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ, महानगर पालिकेचे आयुक्तांचे सहकार्य लाभणार आहे. या लोकअदालतीत मोटर वाहन ट्रॅफिक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार खटले, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित व इतर खटले तसेच खटला दाखलपूर्व प्रकरणे व एकूण ज्या खटल्यांत कायद्याने तडजोड करता येते, असे संपूर्ण खटले ठेवण्यात आले आहेत.