⁠ 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
Home | बातम्या | लाडकी बहीण योजनेबद्दल हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

लाडकी बहीण योजनेबद्दल हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । सध्या नागपूर इथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु असून काल (१६डिसेंबर) अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी घोषणा केली. लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने 35 हजार 788 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत या पुरवणी मागण्यांबद्दल माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे वचन दिले होते. त्यानंतर आता पहिल्याच हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या पुढच्या पैशांची सोय आता मुख्यमंत्र्यांनी सत्ता येताच केलेली आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यावर 1500 ऐवजी 1200 रुपये जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.