⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | वाणिज्य | Ladki Bahin Yojna : महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतायत; कारण आलं समोर?

Ladki Bahin Yojna : महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतायत; कारण आलं समोर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत असून या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. या योजनेतून काही महिलांना या महिन्यात तब्बल ४५०० रुपये मिळाले आहेत. त्यामुळे हे पैसे बँकांनी काही चुका केल्याने त्यांच्या खात्यात जमा झालेत का याचं खरं कारण काय याची माहिती आम्ही शोधली आहे.

या योजनेतील पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्र पैसे मिळाले होते. वेगवेगळ्या तारखांना दोन महिन्यांचे प्रत्येक महिन्यातील १५०० प्रमाणे ३००० रुपये मिळाले होते. यामध्ये काही महिलांचे पैसे बँकाने दंड स्वरुपात कापले देखील होते. ज्या महिलांच्या बँक खात्यात बॅलेंस मिनिमम मेनटेन नव्हता त्यांना दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे बऱ्याच महिलांनी यावर नाराजी व्यक्त करत तक्रार सुद्धा केली होती.

महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देखील याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यावर महिला आणि बाल विकास खात्याकडून बँकाना सांगण्यात आले की, मिनिमम बॅलेन्स मेनटेन नसलेल्या महिलांच्या खात्यातून पैसे कापू नका. तसेच अन्य कोणतीही कारवाई करू नका. त्यानंतर महिलांना आता दंड स्वरूपात कट केलेले पैसे पुन्हा मिळाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात तब्बल १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ महिलांना खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर अन्य महिलांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा होत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.