⁠ 
[rank_math_breadcrumb]

जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील दोन हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून कुंटनखाना सुरू असल्याचे उघडकीला आणले. या कारवाईत एक महिलेची सुटका करण्यात आली असून एका बांगलादेशी तरुणीसह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली.

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या हॉटेल चित्रकूटमध्ये कुंटनखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना मिळाली. त्यांनी त्वरित पथक रवाना केले. पोलीस पथकाने हॉटेल चित्रकूटमध्ये एक डमी ग्राहक पाठविला व त्यास काही आढळल्यास मिस कॉल देण्यास सांगितले. डमी ग्राहकाने मिस कॉल दिल्यानंतर, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटीलसह पथकाने छापा मारला. या कारवाईत काउंटरवर नीलेश गुजर व चेतन माळी आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेले १५०० रुपये आणि मोबाईल आढळले. हॉटेलमधील एका खोलीत डमी ग्राहक व एक महिला आढळली.

पोलिसांनी हॉटेल चित्रकूटमध्ये आढलेल्या महिलेची चौकशी केली असता ती हॉटेल यशमधून आल्याची माहिती तिने दिली. तिच्या सोबत असलेली दुसरी महिला हॉटेल यशमध्ये असल्याचे सांगितले. तेथून व्यवस्थापक विजय सखाराम तायडे याच्यासह एका तरुणीला ताब्यात घेतले. ती तरुणी बांगलादेशी असल्याचे आढळून आले. बांगलादेशी तरुणीकडे कोणतेही दस्ताऐवज आढळून आले नाही.

हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय तायडे याच्याशी बांगलादेशी तरुणीचा संपर्क झाला व देहव्यापारातून तिला पैसे दिले जाणार असल्याचे सांगून तिला येथे आणले असल्याची माहिती सदर तरुणीने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोकॉ गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बांगलादेशी तरुणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.