जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । UPSC परीक्षा ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये यशस्वी झाल्यानंतर, IAS, IPS, IFS, IRS किंवा याहून विविध पदांवर सरकारी नोकरी मिळू शकते. दरम्यान, या परीक्षेत भडगाव तालुक्यातील तरुण उत्तीर्ण झाला आहे. केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयात ऑफिसर पदावर नियुक्ती झाली आहे.
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील कुंदन संतोष हिरे यांनी २०२१ मध्ये UPSC ची परीक्षा दिली होती. परीक्षा उत्तीर्ण झाल्यांनतर नुकत्याच पार पडलेल्या तोंडी मुलाखतीत देशात २४८व्या रॅंकने यश मिळवले आहे. या परीक्षेत देशातून ४२१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
कुंदन हिरे हा येथील निवृत्त शिक्षक साहेबराव हिरे यांचा नातू तर पिचर्डे येथील माजी उपसरपंच विनोद बोरसे यांचा भाचा आहे. या यशाबद्दल कुंदन याचे सर्वत्र काैतुक होत आहे. जिद्द, चिकाटी, निरंतर अभ्यास तसेच याेग्य पद्धतीने अभ्यास केल्याने हे यश मिळाल्याची भावना कुंदन हिरे याने व्यक्त केली आहे.