---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावातील कष्टकरी दाम्पत्याची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२३ । अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी उराशी बाळगून आहे. ते सत्यात उतरविण्यासाठी ते अहोरात्र मेहनत देखील घेत आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) कडून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीची यादी जाहीर करण्यात आली. त्यात जळगाव शहरातील कष्टकरी दाम्पत्याच्या लेकीची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. कोमल सोपान शिंदे असे या तरुणीचे नाव असून अगदी प्रतिकूल परिस्थितीत कोमलने अंगावर खाकी चढवण्याचे आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आहे.

komal shinde psi jpg webp webp

जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरात कोमल सोपान शिंदे ही तरुणी वास्तव्याला आहे. आई वडील आणि एक लहान भाऊ असा तिचा परिवार. वडील सोपान शिंदे हे चौथी नापास. दुचाकीवर गावोगावी जाऊन कपडे विक्री करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर कोमलची आई भारतीसुद्धा गेल्या दहा वर्षांपासून जळगावातील जैन इरिगेशन कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करते व संसाराला हातभार लावते.

---Advertisement---

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. काही दिवसांपूर्वी एकच खोली असलेल्या भाड्याच्या घरात सुद्धा कोमलच्या परिवाराने दिवस काढले. या घरात शौचालय सुद्धा नव्हते, असं कोमल सांगते. मात्र हीच परिस्थिती कोमलची ताकद बनली. काही दिवसांनी आई वडिलांनी जमविलेल्या पैशातून वन रुम किचनचे नवीन घर घेतले. मात्र पोरांसाठी आई वडिलांचे कष्ट सुरूच होते.

कोमल आठवी ते नववीच्या वर्गात शिकत असताना कोमलच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून एक महिला पोलीस अधिकारी आल्या होत्या. या महिला पोलीस अधिकाऱ्याला पाहून कोमलने सुद्धा आपणही पोलीस अधिकारीच व्हायचं, अंगावर वर्दी चढवायची हे स्वप्न बघितलं. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचा प्रवास सुरू झाला, अस कोमल सांगते.

कोमल हिने वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. तर एम एस डब्ल्यू पूर्ण करत तीच पदव्युत्तर शिक्षण सुद्धा पूर्ण झालं आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोमलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती घेत तयारी सुरू केली

आई-वडिलांचे कष्ट कोमल डोळ्याने बघत होती. त्यांच्या कष्टाची तिला जाणीव होती मात्र परिस्थितीशी लढायचं कसं आणि पुढे जायचं कसं हा मार्ग तिला मिळत नव्हता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकाच मार्गदर्शन, खाजगी क्लास लावणं कोमलला आवश्यक वाटलं मात्र त्यासाठी गरज होती ती पैशांची आणि तीच मोठी कोमलची अडचण होती. मात्र ते म्हणतात ना इच्छा असली की देव सुद्धा मार्ग दाखवतो. आणि कोमलच्या बाबतीत तेच झालं. कोमलला पुढे शिकायचंय शिकून मोठ अधिकारी व्हायचंय आणि यासाठी तिच्याकडे क्लास लावण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट कोमलचे ट्रक चालक मामा मुकेश सपके यांना कळाली. आपण शिकलो नाही मात्र भाचीसाठी कुठे कमी पडायचं नाही, भाचीने मोठ व्हावं म्हणून मामा कामात पडला. मामाने कोमल हिला पैशाची मदत केली. त्यानंतर कोमल हिने 2019 मध्ये जळगावातील युनिक ऍकॅडमी मध्ये क्लास लावला. आणि तिची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे तयारी सुरू केली.

चार ते पाच महिन्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची जाहिरात निघाली. प्रचंड आत्मविश्वास असलेल्या कोमलने अर्ज भरला. परीक्षा दिली मात्र काही चुकांमुळे कोमलला पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं. मात्र ते म्हणतात ना अपयश हीच यशाची पहिली पायरी.. अगदी याच पद्धतीने कोमलने पुढे प्रचंड मेहनत घेतली, जिद्दीने अभ्यास केला. मैदानी सराव सुद्धा केला. मात्र एकीकडे तिची स्वप्नांसाठीची परीक्षा सुरू असताना दुसरीकडे मात्र नियतीचीही परीक्षा सुरू होती. 2020 मध्ये कोमल हिने पुन्हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज भरला मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आले 2021 मध्ये सुद्धा ही परीक्षा झाली नाही. या परीक्षेसाठी सप्टेंबर महिना आणि 2022 हे साल उजाडलं. यंदा संधी वाया घालवायची नाही म्हणून तब्बल दहा ते बारा तास सलग कोमलने अभ्यासिकेत तसेच घरी रात्रंदिवस अभ्यास केला. कोमलने पूर्ण तयारीने आणि मेहनतीने अभ्यास करून ही परीक्षा दिली होती. आणि कोमलची मेहनत फळाला आली. ती पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर मुलाखत व मैदानी चाचणीचा टप्पा सुद्धा कोमलने यशस्वीरित्या पार केला. आणि अखेर अंगावर वर्दी चढवून पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---