---Advertisement---
आरोग्य जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात गुडघा अन् खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार मोफत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण करणे हे आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांना परवडणारे नसतात. या दोन्ही शस्त्रक्रियांना लागणार खर्च हा मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक रूग्ण ही शस्त्रक्रिया टाळतात. मात्र आता अशी वेळ कुणावरही येणार नाही. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य आणि आयुषमान भारत योजनेंतर्गत गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.

knee surgery

सततच्या गुडघा आणि खुबा दुखीने त्रस्त झालेल्या रूग्णांना शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय सुचविला जातो. मात्र या शस्त्रक्रियांसाठी वेळ आणि खर्च देखिल मोठ्या प्रमाणावर लागतो. साधारणत: दीड ते दोन लाख रूपये एका शस्त्रक्रियेसाठी लागत असल्याने बहुतांश रूग्ण हे गुडघा दुखी आणि खुबा दुखीकडे दुर्लक्ष करतात. मात्र अशा दुर्लक्षामुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम रूग्णांना सहन करावे लागतात. भविष्यातील हे गंभीर परिणाम टाळण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अनिवार्य ठरते.

---Advertisement---
image
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात गुडघा अन् खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार मोफत 1

शस्त्रक्रियेच्या खर्चाची अडचण झाली दूर
गुडघा आणि खुबा प्रत्यारोपणासाठी लागणारा मोठा खर्च करण्याची अडचण आता दूर झाली आहे. जिल्ह्यातील एकमेव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपलब्ध असलेल्या महात्मा ज्योतिराव फुल जनआरोग्य योजना आणि आयुषमान भारत योजना अशा दोन्ही योजनांमध्ये गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही मोफत केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयालाच अशा प्रकारचे पॅकेज मंजूर झाले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या खर्चाची आता चिंता करण्याची गरज नाही. ज्या रूग्णांना गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावयाची आहे अशांनी त्वरीत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.

तज्ज्ञ अस्थिरोग डॉक्टरांची टीम उपलब्ध
गुडघा आणि खुबा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तज्ज्ञ अस्थिरोग डॉक्टरांची टीम रूग्णांसाठी उपलब्ध आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया व पुढील मार्गदर्शनही केले जाणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---