विद्यार्थ्यांसाठी सरकारची उत्तम योजना? दरमहा मिळते 7000 रुपयांपर्यंतची मदत
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा खर्च हा टेन्शन देणारा प्रकार आहे. भारतामध्ये शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. यासाठी बर्याच वेळा सरकारला टीकेलाही सामोरे जावे लागले. सुरुवातीच्या शिक्षणानंतर बर्याचदा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. याचे एक कारण म्हणजे कुटुंबाची कमकुवत आर्थिक स्थिती.
परंतु केंद्र आणि राज्य सरकार आशा विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना चालवतात, ज्याद्वारे त्यांना आर्थिक मदत दिली जाते. अशीच एक योजना केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना दरमहा 7000 रुपयांपर्यंत मदत दिली जाते.
काय आहे ही योजना?
● किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) फेलोशिपबद्दल आपण जाणून घेऊ. ही योजना शाळा ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देते. परंतु ही आर्थिक मदत केवळ सायन्सच्या विद्यार्थ्यांना दिली जाते.
● ही फेलोशिप योजना अधिकृत आहे, तर ती भारतीय विज्ञान संस्था (बेंगलोर) चालवते. केव्हीपीवायच्या माध्यमातून 11 वी आणि 12 वी व्यतिरिक्त पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील आर्थिक मदत दिली जाते.
● जे विद्यार्थी सायन्सशिवाय टेक्नोलॉजी किंवा मेडिसिन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना केव्हीपीवाय अंतर्गत फेलोशिप मिळेल. सुमारे 22 वर्षांपूर्वी 1999 मध्ये ही योजना सुरू केली गेली.
● या 22 वर्षात विज्ञान क्षेत्रात प्रगती करणाऱ्या बर्याच विद्यार्थ्यांना केव्हीपीवायच्या माध्यमातून मदत केली गेली आहे. केव्हीपीवाय अंतर्गत 5000 आणि 7000 रुपयांच्या 2 फेलोशिप आहेत.
या योजनेमागे सरकारचा हेतू काय आहे? :
जर आपल्याला विज्ञान क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपण या योजनेंतर्गत अर्ज करू शकता. केव्हीपीवायचा उद्देश देशातील विज्ञान क्षेत्रातील हुशार विद्यार्थ्यांना मदत करणे जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित असेल. परंतु हे लक्षात ठेवा की या योजनेंतर्गत चाचणी घेतली जाते. फेलोशिप फक्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिली जाते.
यासाठी परीक्षा कशी असेल?
केव्हीपीवाय अंतर्गत दोन स्टेपमध्ये परीक्षा होते. यामध्ये टेस्ट आणि मुलाखतींचा समावेश आहे. प्रथम ऑनलाईन एप्टिट्यूड टेस्ट होईल. मग मुलाखत घेतली जाईल. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होते. केव्हीपीवायसाठी आपल्याला 10 वी मध्ये गणित व विज्ञानात 75 टक्के गुण असावेत.
अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी विद्यार्थ्यांना यात 10 टक्के सूट मिळते. याशिवाय पदवीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना 12 वी मध्ये 60 टक्के मार्क्स असावे. परंतु आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना येथेही दहा टक्के सूट मिळणार आहे.