जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मुंबई सेशन कोर्टाने फेटाळला आहे, असे टि्वट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. तसेच अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे मंदाताई खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान, याच प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत. या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यापूर्वी अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. मंदाताई खडसेंविरुद्ध अटक वॉरंट जारी झाले असतांना एकनाथ खडसे यांना मात्र न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे दिलासा दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.