---Advertisement---
बातम्या

भाजपला धक्का : जळगाव नव्हे भुसावळात चालली खडसेंची जादू, २१ नगरसेवक राष्ट्रवादीत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । जळगाव शहर मनपातील नगरसेवक गळाला लावण्याची किमया राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना जमली नसली तरी भुसावळ आणि परिसरात मात्र त्यांनी आपला करिष्मा दाखून दिला आहे. उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत २१ नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आजचा प्रवेश भाजपला मोठा धक्का आहे. जळगाव मनपानंतर आ.गिरीश महाजन यांना हा दुसरा मोठा धक्का आहे.

bjp ncp jpg webp

राज्याचे उपमुख्यमंत्री आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून आज जळगावसह भुसावळ येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. भुसावळात पार पडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपच्या २१ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असून आगामी काळात पालिकेत समीकरणे बदलणार आहेत.

---Advertisement---

विशेष म्हणजे फैजपूर येथील ज्येष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी आणि त्यांच्या सौभाग्यवती तथा माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याने मोठा धक्का मानला जात आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरमुळे जिल्हापरिषद निवडणूक आणि नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकांचे चित्र काहीसे वेगळे पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

(ही बातमी आताच समोर आली आहे. या बातमीला आम्ही काही वेळात आणखी अपडेट करीत असून तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---