जळगाव लाईव्ह न्यूज । काश्मीर (Kashmir) खोऱ्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांनी कटरा (Katra) ते काश्मीर (Srinagar) दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकची अंतिम तपासणी सुरू केली आहे, जी आता अंतिम टप्प्यात आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर, कटरा ते काश्मीर ट्रेन चालवण्याची घोषणा कधीही होऊ शकते. Katra Srinagar Train Time Table
रेल्वे सुरक्षा आयुक्त दिनेश चंद्र देशवाल यांनी कटरा ते रियासी या १६.५ किमी लांबीच्या ट्रॅकची ट्रॉली तपासणी केली. सीआरएस आज रामबनमधील कटरा ते बनिहाल या ट्रॅकची विशेष सीआरएस ट्रेन वापरून तपासणी करेल आणि त्याच मार्गाने परत येईल. बनिहाल आणि बारामुल्ला दरम्यान नियमित रेल्वे सेवा आधीच धावत आहेत.
ट्रॉली तपासणीपूर्वी, सीआरएसने श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावर हवन आणि पूजा केली. कटरा ते रियासी हा ट्रॅक उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा अंतिम टप्पा आहे. कटरा येथे ३.२ किमी लांबीच्या टी-१ बोगद्याचे बांधकाम डिसेंबरमध्ये पूर्ण झाले, ज्यामध्ये सतत पाण्याची गळती हा मुख्य अडथळा होता. आता बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी प्रवाह वळवण्यात आला आहे आणि हा बोगदा प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र देखील असेल.
कटरा-श्रीनगर रेल्वे वेळापत्रक जाहीर
कटरा आधीच रेल्वेने देशाच्या उर्वरित भागाशी जोडलेले आहे. रेल्वेने कटरा ते श्रीनगर या तीन गाड्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे, ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. वंदे भारत ट्रेन सुमारे ३ तास १० मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करेल, तर मेल एक्सप्रेस सुमारे ३ तास २० मिनिटे घेईल. वंदे भारत ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल.
वंदे भारत ट्रेन कटरा येथून सकाळी ८:१० वाजता निघेल आणि सकाळी ११:२० वाजता श्रीनगरला पोहोचेल. मेल एक्सप्रेस दररोज धावेल, कटरा येथून सकाळी ९:५० वाजता निघेल आणि श्रीनगर येथे दुपारी १:१० वाजता पोहोचेल. दुसरी मेल एक्सप्रेस दररोज धावेल, कटरा येथून दुपारी ३:०० वाजता निघेल आणि श्रीनगर येथे संध्याकाळी ६:२० वाजता पोहोचेल.
परतीचे वेळापत्रक असे
मेल एक्सप्रेस श्रीनगर येथून सकाळी ८:४५ वाजता निघेल आणि कटरा येथे दुपारी १२:०५ वाजता पोहोचेल. वंदे भारत श्रीनगर येथून दुपारी १२:४५ वाजता निघेल आणि कटरा येथे दुपारी ३:५५ वाजता पोहोचेल. दुसरी मेल एक्सप्रेस श्रीनगर येथून दुपारी ३:१० वाजता निघेल आणि कटरा येथे संध्याकाळी ६:३० वाजता पोहोचेल.
कटरा-श्रीनगरदरम्यानचे स्थानके?
कटरा आणि श्रीनगरला जोडणारी सात स्थानके असणार आहे. ज्यात रियासी, सावलकोट, सांगलदान, रामबन, बनिहाल, काझीगंज आणि बिजबेहरा या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.
किती भाडे लागेल?
कटरा ते श्रीनगर पर्यंतचे भाडे अद्याप निश्चित झालेले नाही. तथापि, वंदे भारत ट्रेनचे एसी चेअर कारचे भाडे १५०० ते १६०० रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे आणि एक्झिक्युटिव्ह चेअरचे भाडे २००० ते २५०० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
कटरा-श्रीनगर वंदे भारत सुविधा
रेल्वेने सांगितले आहे की श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि श्रीनगर दरम्यानचा रेल्वे मार्ग जम्मू आणि काश्मीरमधील कठीण हवामान आणि उंचावरील प्रदेशांना तोंड देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. प्रवाशांना अनेक सुविधा असतील. उदाहरणार्थ, हिवाळ्यात, कोचमध्ये पाण्याच्या पाईप्स आणि थंडीत प्रवाशांना उबदार ठेवण्यासाठी हीटिंग असेल.