---Advertisement---
भुसावळ

कसारा घाटात मालगाडीचे डबे रुळावरून घसरले! पाच गाड्या रद्द, 20 गाड्यांच्या मार्गात बदल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : 11 डिसेंबर 2023 : भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कसारा आणि इगतपुरी दरम्यान डाऊन लाईनवर मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या नंतर घडली असून यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले तर काही गाड्या रद्द केल्या आहेत. एकूण 20 गाड्यांचे मार्ग बदलले तर पाच गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. यातील बहुतेक गाड्या या भुसावळ मार्गे धावणाऱ्या आहे.

train 2

मध्य रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. कसारा ते इगतपुरी दरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. मालगाडीचे डबे रुळावरुन हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले.

---Advertisement---

या गाड्यांचे मार्ग बदलले
17612 सीएसटीएम नांदेड एक्स्प्रेस ही गाडी कल्याणवरुन पुणे दौंड मार्गे वळवण्यात आली.
12105 सीएसटीएम गोंदिया एक्स्प्रेस कल्याणवरुन पुणे दौंड मनमाड मार्गे वळवण्यात आली.
12137 पंजाब मेल ही गाडी दिवा, वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
12289 सीएसटीएम नागपूर दुरांतो एक्स्प्रेस वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
12111 सीएसटीएम अमरावती कल्याण, पुणे दौंड मार्ग पाठवण्यात आली.
12809 सीएसटीएम हवडा वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
17057 सीएसटीएम- सिंकदराबाद कल्याण, पुणे दौंड मार्ग पाठवण्यात आली.
12322 सीएसटीएम हवडा- वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
18029 शालीमार वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
 12167 वाराणसी वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
12141 पाटलीपुत्र वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---