---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

Breaking : जळगाव लोकसभेतून ठाकरे गटाकडून करण पवारांना उमेदवारी, उद्धव ठाकरेंची घोषणा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । जळगावमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं असून खासदार उन्मेष पाटील यांनी आपले कट्टर समर्थक करण पवार यांच्यासह शेकडो समर्थकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उन्मेष पाटीलांचा पक्षप्रवेश मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती पार पडला. यावेळी मातोश्री परिसरात एकच जल्लोष करण्यात आला

karan pawar jpg webp

दरम्यान, उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

---Advertisement---

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामळी यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मशालीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने त्यांना तिकीट देण्यात आलं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---