---Advertisement---
जळगाव जिल्हा

स्मिताताईंसमोर चर्चेस येण्याचे करण पवारांनी टाळले; वाचा काय घडले रोटरी क्लबच्या कार्यक्रमात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । रोटरी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ व महाविकासआघाडीचे उमेदवार करण पवार या प्रतिस्पर्धी उमेदवारांना आमंत्रित केले होते. दोन्ही उमेदवारांना समोरासमोर प्रश्न विचारुन त्यांचे मतदारसंघाच्या विकासाबाबत व्हिजन काय आहे? हे मतदारांसमोर आणणे हा उद्देश होता. स्मिताताई वाघ यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली व संवादही साधला. अनेक नागरिकांशी संवाद, त्यांचे प्रश्न व समस्या ऐकून घेतल्या मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांनी दांडी मारली.

smitatai vagh jpg webp

रोटरी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात जळगाव लोकसभेत ज्यांची थेट लढत आहे अशा दोन्ही उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले होते. स्मिता वाघ मात्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या मात्र महाविकास आघाडीचे करण पवार यांनी दांडी मारली. करण पवार यांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. करण पवार यांच्या त्या कार्यक्रमाला न येण्यामुळे अनेक तर्कवितर्क बांधले जाऊ लागले आहेत. करण पवार आतापासूनच स्मिता वाघ यांच्यासमोर थेटपणे येणे टाळत आहेत, ते स्मिताताईंसमोर येण्यार घाबरले आहे का ? अशी कुजबुज कार्यस्थळी उपस्थितांमध्ये रंगली होती. उबाठा गटातर्फे संजय सावंत यांनी भूमिका मांडली. यावेळी गणी मेमन, सरिता खाचणे, मुनिरा मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या.

---Advertisement---

आजच्या दोन्ही उमेदवारांपैकी एकजण भविष्यात जळगाव जिल्ह्याचे पालकत्व घेणार आहे. अशावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो नेता व्हिजन मांडू शकत नाही. तो चर्चेस दांडी मारतो, असा नेता मतदारसंघ खरंच सांभाळू शकेल का ? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला. फक्त आश्वासने देऊन जनतेच्या कल्याणाची कामे होत नाही त्यासाठी लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, असा सल्ला उपस्थितांपैकी काहींनी त्यांच्या प्रतिनीधींना दिला.

यावेळी करण पवार यांनी तिथे आपल्या ज्या सहकाऱ्याला पाठवले तो पण जळगाव लोकसभा मतदार संघाच्या विकासाबद्दल त्यांचं व्हिजन काय आहे याबद्दल न बोलता ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत होते. तिथे उमेदवारांच्या व्हिजन बद्दल बोलायला बोलावलं असताना तिथे त्या विषयावर न बोलता भलत्याच विषयावर बोलणं कितपत योग्य आहे ? करण पवार यांचं तिथे न येणं आणि त्यांच्या सहकार्याच भलत्याच विषयावर बोलणं या गोष्टींमधून काय अर्थ काढायचा ? त्यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन आहे का ? की उगाच काहीतरी थापा मारत आहेत ? अशा शब्दात उपस्थितांनी करण पवारांच्या प्रतिनिधी समोर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---