⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

Jalgaon : अंगावर खाकी चढवण्याचा निर्धार, लग्नाच्या 12 वर्षानंतर यशाला घातली गवसणी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२३ । आपण बऱ्याच मुला-मुलींची यशोगाथा वाचली असेल किंवा ऐकली आहे. शालेय शिक्षण घेत असताना अनेक जण भविष्यात काय बनायचं आहे हे आधीच ठरवून घेतात. आणि जिद्दीनं ते पूर्ण देखील करतात. अशीच एक जिद्दीचं कहाणी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून समोर आलीय.

जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील सासर तर चोपडा तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या कल्पना ज्ञानेश्वर कोळी यांनी संसार सांभाळून लग्नाच्या १२ वर्षानंतर पोलीस शिपाईपदी नियुक्ती मिळवून यशाला गवसणी घातली आहे. नुकतंच प्रशिक्षण पूर्ण करत कल्पना कोळी या जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्या आहेत.

कल्पना ज्ञानेश्वर कोळी (Kalpana Koli) यांचे २०११ मध्ये मोहाडी येथील ज्ञानेश्वर सोनवणे यांच्याशी लग्न झालं. कल्पना यांच्या सासरी पती ज्ञानेश्वर, सासरे गोकूळ सोनवणे, सासू तुळजाबाई आणि दोन नणंद असा परिवार आहे. तर कल्पना यांना दोन मुलं असून एक सातवीत तर दुसरा तिसरीत शिक्षण घेत आहे.

ड्रमायन, कल्पना कोळी यांचे पती ज्ञानेश्वर गोकुळ सोनवणे हे जळगाव शहरातील एका नामांकित कंपनीत कामगार आहेत. तर सासरे गोकुळ जीवराम सोनवणे हे जळगावात ऑटो रिक्षा चालवतात. कल्पना यांचे पत्नी यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालं, तर सासरे गोकूळ हे पाचवीपर्यंत शिकलेले. तर कल्पना यांनी बारावी आणि त्यानंतर पदवीपर्यंतच शिक्षण जिद्दीने पूर्ण केलं.

..अन् अंगावर वर्दी चढवण्याचा निर्धार केला

पदवीला शिकत असताना महाविद्यालयात जाण्यासाठी कल्पना पोलीस कवायत मैदानावरुन जायच्या. यादरम्यान त्यांना अंगावर वर्दी असलेले पोलीस परेड करताना तर काही तरुण हे पोलीस भरतीची तयारी करताना दिसायचे. त्याचवेळी कल्पना यांनी पोलीस होण्यााचा अंगावर वर्दी चढवण्याचा निर्धार केला. याचदरम्यान कल्पना यांचा भाऊ विनोद कोळी हा पोलीस झाला. कल्पना यांनी भाऊ विनोद यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर पती तसंच सासरऱ्यांनाही कल्पना यांनी त्यांना पोलीस होण्याचं सांगितलं.

सासरच्या मंडळींचा मिळाला पाठिंबा
सासरे कल्पना यांच्या पाठीशी अगदी वडीलांप्रमाणे खंबीर उभे राहिले. कल्पना यांना तयारीसाठी वेळ दिला. कल्पना यांच्या दोन्ही मुलांना सासू तुळजाबाई आणि नणंद या दोघींनी सांभाळलं. केवळ पतीच नाही तर सासरच्या मंडळींचा आपल्या पाठींबा असल्याचं पाहून कल्पनाच्या अंगात मोठा उत्साह संचारला.