जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी गेल्या २ महिन्यांपासून उपोषणाच्या प्रतीक्षेत असलेले ग्रामस्थ ३ दिवसापूर्वी उपोषणाला बसले होते. सोमवारी रात्री १० वाजता पोलीस निरीक्षक अशोक उतेकर व तहसीलदार सागर ढवळे यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, उपोषणकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम होते. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना अखेर यश आले असून पालकमंत्री, आमदार, सरपंच, उपसरपंच यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी उपोषण मागे घेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी मागील २ महिन्यापूर्वी जुवार्डी ग्रामस्थ प्रलंबित पाणीपुरवठा प्रश्न उपोषणसाठी बसणार असल्याने त्यांनी संबंधीत अधिकारी यांचे वेळोवेळी बैठक लावुन त्यांना उपोषणपासून परावृत्त केले. त्याचप्रमाणे आज त्यांनी परिश्रम घेवून जुवार्डी गावाच्या मागण्यांचा पाठपुरावा करून तातडीने संबंधीत अधिकारी यांची बैठक लावून ३ दिवसापासून ते स्वतः गोपनीयचे अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी दररोज गावात भेट देवून तातडीने प्रश्न सोडविला. त्यांच्या हस्ते आज रोजी उपोषण बसणारे रामदास किसन पाटील, भगवान पंडीत पाटील, भालेराव खंडु पाटील, साहेबराव आत्माराम पाटील, सुनिल रंगराव पाटील व इतर गामस्थ यांनी उपोषण मागे घेतले. त्यांच्या सर्व मागण्या आमदार किशोर पाटील यांनी यापूर्वी जुवार्डी-बहाळ रस्ता, गावासाठी स्वतंत्र डी.पी. बहाळ रस्त्यावरील फरशी व वॉटर सप्लायसाठी स्वतंत्र डी.पी. बसविण्यासाठी एक महिन्यापूर्वी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्या सर्व प्रती (पत्रव्यवहार) आज त्यांनी ग्रामस्थांकडे सादर केल्या. मेंढपाळ यांचा बंदोबस्त तातडीने करण्यासाठी त्यांनी वनविभागास पत्रव्यवहार केलेला आहे. यातील बऱ्याच मागण्या किशोर पाटील यांनी यापूर्वीच मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठविल्या आहेत.
जुवार्डी गावासाठी आ.पाटील यांनी ६ महिन्यात ७० लाखाच्या विविध कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आ.पाटील हे मुंबई येथे असल्याने त्यांना उपोषणकर्ते यांचेबरोबर व्हिडिओ कॉल व्दारे संपर्क करून त्यांच्या सर्व मागण्या मंजुर केलेल्या आहेत व त्यांचा पाठपुरावा ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांच्या विनंतीला संबंधीत ग्रामस्थांनी मान न दिल्याने त्या अधिकाऱ्यांनी आम्ही आमच्या वरिष्ठांबरोबर चर्चा करतो असे सांगितले होते. त्याप्रमाणे मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या बरोबर संरपंच सुनिता गोरख ठाकरे व उपसंरपंच पी.ए.पाटील व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी चर्चा करून मंगळवारी दुपारी उपोषणाची सांगता केली. प्रसंगी गटविकास अधिकारी रमेश वाघ, विस्तार अधिकारी टी.पी.मोरे, बांधकाम अभियंता आखाडे, रावसाहेब, बांधकाम विभाग एरंडोल श्री.थोरात, महावितरण अभियंता विजय पवार, वनक्षेत्रपाळ चाळीसगाव प्रा.जी.व्ही.धाडे, वनपाल आर. व्ही.चौरे, वनरक्षक भाला परदेशी, वनरक्षक राहुल पाटील व गावातील जेष्ठ नागरिक व आजी-माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.